बुलढाणा जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत आराध्य बंड ची विभागीय स्तरावर निवड !

0
118

रोषण आगरकर, ऊपसंपादक, जगदीश न्युज

नांदुरा येथील श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झाबंड विद्यानिकेतन मधील वर्ग सात चा विद्यार्थी आराध्य विशाल बंड याने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असुन त्याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे
महाराष्ट्र राज्य युवा व क्रीडा संचनालय पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन 4 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे केलेले होते
त्यामध्ये 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या साखळी सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करत श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन नांदुराचा वर्ग सात चा विद्यार्थी आराध्य विशाल बंड याने प्रथम क्रमांक पटकावल्याने विभागीय स्तरासाठी याची निवड झालेली आहे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आराध्य हा डॉक्टर विशाल वामनराव बंड (मातोश्री क्लिनिक : गजानन महाराज संकुल, डाॅ. हेगडेवार मार्ग, नांदुरा ) यांचा मुलगा असून ते सुद्धा चांगले खेळाडू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here