घरगुती गॅस वाहनात भरतांना आरोपीस अटक !24 सिलिंडर व पेट्रोलसह 61 हजारांचे साहित्य जप्त..!!स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मलकापूर तालुक्यात कारवाई….

0
319

कैलास काळे, जगदीश न्युज प्रतिनिधी,मलकापूर

तालुक्यातील देवधाबा येथे अनधिकृत घरगुती गॅस सिलिंडर व ज्वालाग्राही पदार्थ विनापरवाना वापर करताना एकास रंगेहाथ पकडण्यात आले.त्याच्याकडून 24 गॅस सिलिंडर व 7 लिटर पेट्रोल असा 61 हजार 200 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवधाबा येथे आज, 16 दुपारी ही कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी की, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, सुरक्षेचे उपाय न करता गॅस सिलिंडरचा वापर केला जातो.त्याचबरोबर ज्वालाग्राही ङूपदार्थांचा विनापरवाना वापर केला जातो, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज दुपारी मलकापूर येथे दाखल झाले. तालुक्यातील देवधाबा येथील सचिन गणेश महाजन हा त्याच्या घराजवळ तीन चाकी व चार चाकी वाहनात घरगुती गॅस भरत असताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याच्याकडील भरलेले 4 व रिकामे 20 असे एकूण 24 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर विनापरवाना वापरात असलेले 7 लिटर पेट्रोल असे 61 हजार 200 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणी पोलीस काँस्टेबल गणेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गणेश महाजन याच्याविरूद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात अपराध नं.250/23 कलम 285 भादंवि व कलम 3,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचेे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी, गणेश पाटील, गणेश शेळके व बिट जमादार रविकांत बावस्कर यांनी केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here