श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव भक्तीभावात प्रारंभ !भजनी दिंड्या शेगांवात शहरात दाखल !!विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन …..

0
19


गिरीश पळसोदकर, जगदीश न्युज प्रतिनिधी, शेगांव / खामगांव

शेगांव श्री संत गजानन महाराजांचा ११३ वा पुण्यतिथी उत्सव दि १६ सष्टेबर रोजी परंपरेनुसार आज
संतनगरीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
आज दि.१६ सष्टेबर रोजी सकाळी.या उत्सवात श्री गणेशयागास व वरुनयागास ब्रम्हवृंद यांच्या हस्ते विधिवत पुजन करून सुरवात करण्यात आले आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थानमघ्ये ५ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.यात दररोज सकाळी ६ ते६.३० काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन,व हरिपाठ ५.३० ते ६, सांयकाळी ८ ते १०कीर्तन
दि.१६ रोजी.ह.भ.प.सुनीलबुवा शिंगणे रा.देऊळगांव
दि.१७ रोजी. ह.भ.प.अनिरुद्धबुवा क्षिरसागर रा.सावरगांव.दि.१८ रोजी ह.भ.प.गणेश हुंबाड.रा.महागांव.दि.१९ रोजी.ह.भ.प.पडीतबुवा क्षिरसागर रा.श्री.क्षैत्र आळदी.दि.२० रोजी. ह.भ.प.
भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे सायंकाळी कीर्तन होईल.तर
श्रींचे समाधी सोहळा. दि.२० सष्टेबर रोजी हभप श्री भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे सकाळी ७ ते ९ श्रींचे समाधी सोहळानिमित्त कीर्तन होणार आहे. दि २० सष्टेबर रोजी सकाळी १० वा.श्री गणेशयागास व वरुनयागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत होईल. तर दुपारी उत्सवाची पालखीचे श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन होवून श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, दिंड्या पताका टाळकरी,अश्‍वासह परिक्रमा निघेल. सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा व श्रींची आरती होणार आहे. रात्री ८ ते १० हभप श्रीभरतबुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे.
दि.२१ सष्टेबर रोजी हभप श्रीधरबुवा आवारे मु. खापरवाडी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे.
यानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व तोरण लावण्यात येवून भक्तीमय वातावरण असून श्रींच्या नामघोषात भक्त तल्लीन होत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहेत.

श्री मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होईल हे लक्षात घेता व काही अप्रिय घटना घडू नये याची दक्षता म्हणून वन-वे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात श्रींची समाधि दर्शन व्यवस्था, श्रीमुख दर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री पारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था केलेली आहे.
मा. उच्च न्यायालयाचे निर्देशानूसार श्री मंदिर परिसराच्या पश्चिम भागावर श्री संस्थेद्वारा १२ मीटर रूंदीचा नविन भव्य रस्ता विकसित करण्यात आला आहे.
सर्व उत्सव व विशेष प्रसंगी आणी वर्षभरात येणाऱ्या शेकडो दिंड्या, पालख्या तसेच शोभायात्रा व मिरवणुकीमुळे श्री मंदिर परिसरात आधीच असणाऱ्या प्रचंड गर्दीमध्ये आणखी वाढ होत आहे. करीता भाविक भक्तांची सुरक्षा व सुव्यवस्था लक्षात घेऊन, प्रसंगी कोणतीही अनुचित व अप्रिय घटना घडू नये म्हणून गर्दीचे नियोजनासाठी विविध मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार खबरदारीची उपाययोजना म्हणून ह्या सर्व दिंड्या, पालख्या, शोभायात्रा व मिरवणुकी ह्या सर्व सदर १२ मीटर रस्त्यावरील श्री मंदिर परिसराचे पश्चिमद्वारातून आत येतील. सर्व देवी-देवतांचे व संत-महंतांचे, ब्राह्मणवृंदांद्वारा पुजन करुन संबंधीतांचा यथोचित सत्कार तसेच सहभागी सर्व भाविकांना चहापान इत्यादी सोपस्कार पार पडून ह्या दिंड्या, पालख्या, शोभायात्रा व मिरवणुकी श्री मंदिर परिसराच्या दक्षिण द्वारातून पुढे मार्गस्थ होतील. यासाठी श्री संस्थानच्या नियोजनास सर्वांनी सहकार्य करुन सहयोग प्रदान करावा. ही नम्र विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here