
बाळासाहेब नेरकर, जगदीश न्युज प्रतिनिधी, अकोला
अकोला
गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न
शहरातील आनंद बालिका आश्रम येथे सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये परिसरातील 50 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पर्यावरण जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक मूर्तीमध्ये एक बी टाकण्यात आले गणपती विसर्जना नंतर त्यामध्ये बीजारोपण च्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येईल पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
कार्यशाळेमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या मुर्त्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये तीन गट करण्यात आले होते.यामध्ये प्रत्येकी गटांमधून प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले व त्यांना मेडल ,प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ संजय तिडके,समाजसेविका सौ निशा तिडके,आश्रमच्या संचालिका तपोदिरा दीदी, समुपदेशक डॉ. संतोष पस्तापुरे प्रा.अतुल यादगिरे उपस्थित होते. डॉ. संजय तिडके यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती मधील बी चे बीजारोपण करण्याचे आवाहन केले.व राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक सुद्धा केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाडगे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आयोजक रोहन बुंदेले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु.वैष्णवी आसेकर तर आभार सतीश अस्वार यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गणेश सोळंके ,वैष्णवी ताथोड,पूजा नेमाडे,श्रद्धा डाबेराव, स्वराली सोनटक्के, भाग्यश्री वेरूळकर, अदिती डहाके .मुक्ता आर्य सत्यप्रकाश आर्य यांनी अथक परिश्रम घेतली.
